नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे.

यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय (एसएटीएटी) हा उपक्रम 1ऑक्टोबर 2018 पासून सुरू केला आहे. जून 2019 पर्यंत तेल विपणन कंपन्या आणि गॅस विपणन कंपन्यांनी संपीडित बायोगॅसचा पुरवठा आणि निर्मितीसाठी 344 संयंत्रांना लेटर ऑफ इंटेट दिले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.