नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मधे होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना नामांकन मिळालं आहे.

बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन उपाध्यक्ष होते. त्यांना नामांकनासाठी आवश्यक मतं मिळाली असून येत्या ऑगस्टमधे त्यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा होईल.

भारताप्रति बायडन यांचा दृष्टीकोन अनुकूल राहिला असून भारत अमेरिका अणु करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.