भोसरी : असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक गुरूवार दिनांक १८/०७/२०१९ भोसरी एम.आय.डी.सी. येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सतिशचंद्र जकाते यांनी भूषविले.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आदरणीय केशवदत्त चंडोला साहेब यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्याना उत्तम आरोग्य लाभावे या साठी पुणे जिल्हा कार्यकारणीच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
१८ जूलै साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथिनिमीत्त त्यांंना आदरांजली वाहण्यात आली. त्या नंतर दलित पॅन्थरचे संस्थापक, बंडखोर व आक्रमक साहित्यिक राजा ढाले आणि जेष्ठ पत्रकार दिवाकर मेघे यांंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भारत देशातील ज्या पत्रकारांंवर भ्याड हल्ला होतो, अशा प्रतिगाम्यांचा निषेध करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ज्या पत्रकारांच्या अडीअडचणी आहेत, त्या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांंना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीसाठी असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेचे पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार अँँड. मोहन अडसूळ, पुणे जिल्हा अध्यक्ष सतिषचंद्र जकाते, उपाध्यक्ष शशिकांत डांगे, सचिव महेश आनंदा लोंढे, संघटक मंगेश देवडे, कार्याध्यक्ष प्रा.यशवंतराव गायकवाड हे उपस्थित होते.
संघटक मंगेश देवडे यांंनी सर्वांचे आभार मानले.