नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक्सिको सीमेवर बांधल्या जात असलेल्या भिंतीसाठीचा निधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रोखला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ही भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता.

आधीच्या सरकारचा हा निर्णय अनाठायी असल्याने त्यासाठी यापुढे निधी देता येणार नाही, असे बायडन यांनी अमेरिकी कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. भिंत बांधण्याच्या या प्रकल्पावर आतापर्यंत २५ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.