नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदला संदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिका पुन्हा सहभागी झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल  ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली.

हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा हा महत्त्वाचा दिवस असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अमेरीकेने या आधीच प्रयत्न सुरू केले असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं आहे.

२० जानेवारीला जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच पॅरीस करारात पुन्हा सहभागी होण्याबाबत आवश्यक आदेशांवर स्वाक्षरी केली होती. गेल्या वर्षी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली होती.