नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. “बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे ” अशी यावर्षीची संकल्पना आहे.

भारतात २०१५ पासून हा दिवस साजरा केला जात असून यावर्षीही केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं या निमित्त चार दिवस विविध कार्यक्रमांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजन केलं आहे.

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू एका वेबिनारला संबोधित करणार असून एका आंतरराष्ट्रीय आभासी सुलेखन प्रदर्शनाचं उद्घाटनदेखील नायडू यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल हे देखील या वेबिनारमध्ये आपले विचार मांडणार आहेत.