नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबई आणि मध्यप्रदेश यांच्यातला अंतिम सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. आज दुसरा दिवस संपला त्यावेळी मध्यप्रदेशच्या १ बाद १२३ धावा झाल्या होत्या. ते आणखी २५१ धावा पिछाडीवर आहेत. सलामीवीर यश दुबेनं ४४ धावा, आणि शुभम शर्मा ४१ धावांवर खेळत आहेत. त्याआधी हिमांशू मंत्री ३१ धावा करुन तंबूत परतला. मुंबईनं पहिल्या डावात सर्वबाद ३७४ धावा केल्या होत्या. मुंबईतर्फे सरफराज खाननं सर्वाधिक १३४ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालनं ७८ धावांचं योगदान दिलं. मध्य प्रदेशच्या गौरव यादवनं ४, तर अनुभव अग्रवालनं मुंबईचे तीन गडी बाद केले.