नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान काल कँटरबरी इथं झालेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करुन मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी विक्रमी ३३३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ २४५ धावा करु शकला. रेणुका ठाकुरनं चार गडी बाद केले. हरमनप्रीत कौर सामनावीर ठरली. तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. यानंतर अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.