नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने MakeMyTrip आणि Goibibo विरुद्ध त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल आणि OYO सोबत स्पर्धाविरोधी व्यवस्थापन केल्याबद्दल हा निर्णय घेतला आहे. MMT-Go आपल्या हॉटेल भागीदारांवर मनमानी पद्धतीने खोल्यांच्या उपलब्धतेनुसार दर लादत असल्याचं आढळून आल्याचं CCI ने म्हटलं आहे. MMT-Go संबंधित बाजारपेठेतील उत्कृष्ठ स्पर्धक असून ग्राहक MMT-Gos वेबसाइटवर अपलोड केल्या जाणार्या माहिती वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. सीसीआय नं आपल्या निवेदनात म्हटले आहे की, MMT-Gos प्लॅटफॉर्मवरील चुकीची माहिती ग्राहकांची दिशाभूल करू शकते.