नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचं दळणवळण, संपर्क, वाहतूक आणि वैमानिकांचं प्रशिक्षण यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. या सहा विमानांचं उत्पादन इंधन-कार्यक्षम इंजिनसह पाच ब्लेडयुक्त कंपोझिट प्रोपेलरसह नव्या तंत्राचा वापर करुन केलं जाईल. ही विमानं ईशान्येकडील सध्या काम सुरु असलेल्या आणि लहान धावपट्टी तसंच भारतीय बेटांवरील मोहिमांसाठी वापरातं येईल. या सहा विमानांची भर पडल्याने दुर्गम भागात भारतीय वायुसेनेची दळणवळण क्षमता आणखी वाढेल. असंही या निवेदनांत म्हटलं आहे.