नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी घातली आहे. मेमरी चिप निर्मितीतील अमेरिकेची बलाढ्य कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी निर्मित उत्पादने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे चीन ने म्हटले आहे. चीनमधील सायबरस्पेस नियंत्रक संस्था सीएसी ने रविवारी कंपनीच्या चिप मुळे नेटवर्क सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे जाहीर केले.