नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा रस्ते संघटना, या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली. या प्रस्तावित संघटने बद्दल महासंचालक, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंंग यांनी विस्तृत माहिती दिली.
सीमा भागालगत संरक्षण दलांसाठी रस्त्यांचं जाळं कसं बनवता येईल, या बाबत देखील त्यांनी सादरीकरण केलं. हरपाल सिंग यांनी केलेल्या सादरीकरणासाठी राजनाथ सिंग यांनी त्यांची प्रशंसा करतानाच सीमा भागालगत राहणाऱ्या नागरिकांना देखील याचा लाभ होईल, असं सांगितलं. या संदर्भात अन्य सदस्यांनी देखील आपली मतं मांडली.






