नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं तिस-यांदा सत्ता संपादन केली आहे. भाजपानं आठ जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक महत्त्वाचे नेते निवडणुकीत विजयी झाले आहेत.
त्यांच्या नऊ महिला उमेदवारांपैकी आठ जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसला यावेळीही खातं उघडता आलं नाही. काँग्रेसचे फक्त तीन उमेदवार वगळता इतरांना अनामतही वाचवता आली नाही.
काँग्रेसनं या निवडणुकी 66 जागा लढवल्या होत्या, इतर जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला दिल्या होत्या. त्यांच्या बहुतांश उमेदवारांना पाच टक्क्यापेक्षा कमी मतं मिळाली.