नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली.

शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत बँकांच्या विलनीकरणाच्या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचं त्या म्हणाल्या. येत्या काही महिन्यात व्याज दरात वाढ होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी वर्तवली.

अतिरिक्त चलनामुळे मुद्रा नीती अनुकूल बनण्याला मदत होईल,असंही दास यांनी सांगितलं. आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या अंदाजानुसार पुढच्या वर्षी वृद्धी दर सहा टक्के असेल, असंही दास यांनी सांगितलं.