मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, हे खातेवाटप पुढीलप्रमाणे:-

 कॅबिनेट मंत्री :

  • राधाकृष्ण विखे पाटील:- गृहनिर्माण
  • जयदत्त क्षीरसागर:- रोजगार हमी व फलोत्पादन
  • ॲड. आशिष शेलार:- शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • डॉ. संजय कुटे:-  कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण
  • डॉ. सुरेश खाडे:- सामाजिक न्याय
  • डॉ.अनिल बोंडे:- कृषी
  • प्राचार्य. डॉ. अशोक उईके:- आदिवासी विकास
  • प्रा. डॉ. तानाजी सावंत:- जलसंधारण
  • राम शिंदे :- पणन व वस्त्रोद्योग
  • संभाजी पाटील निलंगेकर :- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
  • जयकुमार रावल:- अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
  • सुभाष देशमुख:- सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री:

  • योगेश सागर:- नगरविकास
  • अविनाश महातेकर:- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
  • संजय (बाळा) भेगडे:- कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
  • डॉ. परिणय फुके:- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आदिवासी विकास
  • अतुल सावे:- उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ