नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी संभोग आणि मुलांच्या लैंगिक संबंधांवर केलेल्या वक्तव्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. तसंच, इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य विरोधात राज्य सरकार खटला दाखल करणार नाही, असं महिला आणि बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराजां विरोधात खटला दाखल करण्याची मागणी केली होती.
इंदुरीकर महाराज यांनी प्रसुतीपूर्व आणि गर्भलिंग निदान कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केलं असल्याचा, आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केला आहे.