नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सुरु केलेल्या वेगवेगळया योजना आणि धोरणांवर देशातल्या युवकांनी चिंतन, मनन करावं, आणि वादविवाद देखील करावा, असं आवाहन गृहाराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलं.

ते आज हैदराबाद इथं भारतीय व्यापार परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात, आयडियाज फॉर इंडिया ट्वेंटी ट्वेंटी या परिसंवादाला संबोधित करताना बोलत होते. युवकांनी कायदा सुव्यवस्थेचं भान राखत दारिद्रय निर्मुलन करण्यासाठी नवनवीन कल्पनांसह पुढे यावं, भारताला पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्यासाठी युवकांचं योगदान महत्वपूर्ण असेल, असंही ते म्हणाले.

युवकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी युवकांना आवाहन केलं.