नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली.

काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या असून, घटनास्थळावरुन जप्त केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर, बेहिशोबी रोकडीचा आकडा वाढू शकतो, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याची, तसंच खाण आणि मद्य उद्योगातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रकमेचा वापर होत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर, प्राप्तीकर विभागानं या धाडी टाकल्या.