नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत. घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात दिलं आहे

काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केलेल्या तयारीचा व्यापक आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहेतसंच स्वतःच्या संरक्षणासाठी लहान पणमहत्वाची काळजी घेतली पाहिजे असंही मोदी म्हणाले.

इटाली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नागरिकांना सरकारनं सर्व नियमित व्हिसा आणि ई-व्हिसा तातडीनं स्थगित केले आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसची साथ पसरल्यावर सरकारनं पॅरासिटेमॉल, जीवनसत्व बी-एक आणि बी-बारा यांच्यासह २६ औषधी घटकांच्या निर्यातीला बंदी घातली आहे.