नवी दिल्ली : पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील जीडीपीचा प्रस्तावित अंदाज-दृष्टीकोन आणि कामगिरी या विषयावर एक विस्तृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून हे पत्रक http://eacpm.gov.in/reports-papers/eac-reports-papers/वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जानेवारी 2015 मध्ये भारताने सकल देशांतर्गत उत्पादनाच्या प्रस्तावित पद्धतीत सुधारणा झाली असल्याचे स्पष्ट स्वरुपात या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. वर्ष 2011-12 ला पायाभूत वर्ष म्हणून अवलंबण्यात आल्यानंतर नवीन कार्यपद्धतीमध्ये दोन मुख्य सुधारणा जसे की, एमसीए21 डाटाबेस आणि सिस्टीम ऑफ नॅशनल अकाऊंट 2008 च्या शिफारशींचा आंतर्भाव आहे. हा बदल इतर देशांनाही त्यांच्या जीडीपी गणितमान ठरवितांना या पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक आहे. सरासरी बघता आर्थिक सहकार्य आणि विकास संघटन अर्थात ओईसीडी देशांमध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाचा वास्तविक अंदाज 0.7 टक्क्याने वाढला असल्याचे सांगितले.

प्रसिद्धीपत्रकात अखेर असे सांगितले आहे की, भारताची जीडीपी अंदाजित पद्धत ही अचूक नसून सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, आर्थिक सांख्यिकीय डाटा अचूक येण्यासाठी विविध दृष्टीकोनातून कार्यरत आहेत. तथापि दिशानिर्देशन आणि अचूकतेत वाढ ही भारताच्या जीडीपी अंदाजित पद्धतीला जागतिक प्रमाणक असून ती पारदर्शक, जबाबदार आहे.