नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना वैद्यकीय मदत आणि अन्य सहकार्य मिळावं याची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं खात्री करून घ्यावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

इराणमधील कोम शहरात चाळीसहून अधिक भारतीय नागरिक अडकले असून त्यांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्यानं आपण या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी लक्ष घालावं अशी विनंती केली असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.