नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक असून आजारांविषयी जागृती आणि उपचार करण्यासाठी आता आरोग्य उपकेद्रांतही डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ते आज औरंगाबाद इथं एमआयटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते. सर्वाधिक निधी आरोग्य योजनांवर खर्च व्हावा अशी अपेक्षा यावेळी खासदार इम्तीयाज जलील यांनी व्यक्त केली.