नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळाप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले, तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी, राखी आणि राधा यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली.

सीबीआयनं दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालात या पाच जणांसह अजून दोघांची आणि पाच कंपन्यांची नावं, आरोपी म्हणून समाविष्ट केली आहेत.