नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ आणि वाशिम जिल्हा लाच लुचपत विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना अटक केली.
या सगळ्यांनी तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भातली तक्रार मिळाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.