नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडित कर्जांमुळे डिसेंबरच्या तिमाहीत येस बँकेला १८ हजार ६५४ कोटींचा तोटा झाल्याचं स्पष्ट झाले आहे.
बुडित कर्जांमुळे एकूण ४० हजार ७०९ कोटी रुपयांचं नुकसान बँकेला सहन करावं लागलं आहे.
हे प्रमाण एकूण संपत्तीच्या १८ पूर्णांक ८७ टक्के एवढं आहे.
सप्टेंबरच्या तिमाहीत हे नुकसान १७ हजार १३४ कोटी रुपये म्हणजेच ७ पूर्णांक ३९ टक्के एवढं होतं.
या महिन्याच्या ५ तारखेला रिझर्व्ह बँकेनं बँकेवर बंदी आणली होती आणि भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी प्रशांत कुमार यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं आहे.