नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे.
अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये,६०वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि १० वर्षाच्या आतल्या मुलांनी पुढचे काही आठवडे घरातच रहावं,आरोग्य विषयक सेवा सुविधा, यंत्रणांवर ताण येऊ नये या दृष्टीनं नेहमीच्या तपासण्या तसंच तातडीची गरज नसलेल्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या, उद्या 22 मार्चला सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान जनता संचारबंदी पाळावी.
या काळात आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्यांचे संध्याकाळी ५ वाजता सामूहिक आभार मानावे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, कोणीही या वस्तूंची साठेबाजी करु नये.कोविड 19 च्या साथीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या नेतृत्वात विशेष कृतीदल तयार करण्यात आलं आहे.
सर्व आर्थिक स्तरातल्या घटकांना याचा फटका बसत असून, दुर्बल घटकांना सुस्थितीत असणा-यांनी मदत करावी, कोरोना प्रादुर्भावाबाबत अफवा पसरवू नयेत, तसंच पसरु देऊ नये, अशी ९ आवाहनं प्रधानमंत्र्यांनी गेल्या गुरुवारी देशवासियांना संबोधताना केली.