नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनता कर्फ्यूच्या काळातच विवाह समारंभ आयोजित करणा-या एका पोलीस अधिका-याविरुद्ध औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा विवाह समारंभ काल हर्सूल फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला.
नववधुवरांच्या नातलगांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188 अनुसार गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.