मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान, तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
- अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
- अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
- मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
- मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020