नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून पिकविमा अनुदान वाटप तुर्त बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव यांनी आज दिली. बँकेचे पिकविमा व्यतिरीक्त इतर व्यवहार अत्यावश्यक सेवा उचल देण्यासाठी तत्पर सेवा उपलब्ध राहतील असेही बँकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.