नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगलीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले. त्यात दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. इस्लामपूर मधले एकाच कुटुंबातले चार लोक सौदी अरब इथं हज यात्रेसाठी गेले होते. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं होतं.
हे चौघेही जण कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही रुग्णांना मिरजेच्या जिल्हा परिषद रुग्णालयात पुढील उपचारासाठी ठेवलं आहे.