नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढचे सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्यात उपलब्ध असल्यानं नागरिकांनी काळजी करू नये. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दीदेखील करू नये, असं आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
नागरिकांनी संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये. तसंच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिनं जावं, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी, असं भुजबळ यांनी सांगितलं आहे.