नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी कृषी आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही, या वाहतुकीत अडथळे आले तर संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केलं आहे.
गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, आणि कोरोनाचा धोका वाढवू नका असंही त्यांनी सांगितलं.
अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणाऱ्यांची खात्री पटली असेल तर त्यांच्यावर कारवाई करू नका असं आवाहन त्यांनी केलं.