नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ८० कोटी नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू तर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देशात सध्या लागू केलेल्या संचारबंदीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना या काळात कामावर हजर मानलं जाणार असून, पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजापासून अंतर राखण्याच्या आवश्यकतेवर या बैठकी भर देण्यात आला.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून या वस्तू सातत्यानं उपलब्ध असतील, असं प्रकाश जावडेकर यांनी नमूद केलं.