नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांनी घोषित केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष कोरोनाविरुद्ध सामजिक बांधिलकीनं साजरे करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या शोभायात्रा, कार्यक्रम आदी रद्द झाले असले, तरी प्रत्येकाने घराच्या अंगणात गुढी उभारून नववर्ष साजरे केले.
जगाच्या वेशीवरून कोरोना विषाणूचा नायनाट होवो, याबाबत प्रार्थना केली. समाजमाध्यमांवरही राष्ट्रहित, डॉक्टर, नर्स, पोलीस, कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोनाबाबत जनजागृतीही करण्यात आली.