नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात आता नौदलानंही पुढाकार घेतला आहे. नौदलाच्या डॉर्नियर या विमानानं काल गोवा इथून कोरोना विषाणू संशयित ६० रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पोचवले.
गोवा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचं पथकही या विमानात होतं. याआधीही नौदलाचं विमान गोव्याच्या आरोग्य पथकाला घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत प्रशिक्षणासाठी गेलं होतं. नौदलाच्या प्रसिद्धी विभागानं आज ही माहिती दिली.