नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत तीन ठिकाणी धाड घालून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचे मास्क आणि सात लाख रुपयांचं हॅन्ड सॅनिटायझर जप्त केलं. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.
गोरेगाव पूर्व , मानखुर्द आणि धारावीत ही धाड टाकण्यात आली. गोरेगाव मधल्या गोकुळधाम इथून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांच्या ६१४ सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या तर मानखुर्द मधून ७५ लाख रुपयांचे दोन लाख ९७ हजार मास्क जप्त करण्यात आले.
धारावीतून साडेचार लाख रुपयांच्या तीन हजार बाटल्या आणि सुमारे २२ लाख रुपयांचे दिड लाख मास्क पोलिसांनी जप्त केले.