New Delhi: Medics carry out screening as police cordoned off an area in Nizamuddin after some people showed coronavirus symptoms, in New Delhi, Monday, March 30, 2020. The police took around 200 such people to various hospitals as they participated in a religious congregation at a mosque, few days back. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI30-03-2020_000228B)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू  संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे.
मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे पंधराशे ते सतराशे लोक एकत्र आले होते यापैकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली.
या कार्यक्रमात सहभागी होऊन इतरत्र गेलेल्या एक हजार ३३ लोकांपैकी आतापर्यंत सुमारे ३३४ लोकांना रुग्णालयात भर्ती केलं आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यापैकी ७०० लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तसेच धार्मिक समारंभाचं आयोजन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिल्ली सरकारनं दिला आहे.