नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोला टपाल विभाग ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्या कुटुंबात तरूण नाहीत अशा कुटुंबांना टपाल कार्यालयांमार्फत बँकांची सेवा प्रदान करणार आहे.
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ज्यांची खाती आहेत त्यांना दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम स्वतः पोस्टमन काढून देतील,असं टपाल विभागानं सांगितलं आहे.
संबंधित ग्राहकांना टपाल खात्याच्याही विविध सेवा आणि किराणा माल आणून देण्याची सेवाही दिली जाणार आहे. या सेवा अकोला आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यात पुरवल्या जाणार असल्याची माहिती, अकोला इथल्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.