नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयं कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ एप्रिल पर्यंत बंद असल्यानं विद्यापीठाच्या उन्हाळी पदव्युत्तर, विधी आणि अन्य अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या सर्व परीक्षांचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर येत्या १५ एप्रिल नंतर प्रकाशित केलं जाईल, असं विद्यापीठं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.