नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत देशभरातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

या उपाययोजनांच्या अंमलबजावणीदरम्यान राज्या-राज्यांमध्ये येणाऱ्या अडचणी तसंच इतर बाबी त्यांनी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते.