नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या लागू असलेल्या बंदच्या काळात सर्वसामान्य नागरिकांनी  आपल्या मोकळ्या वेळाचा उपयोग वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी करावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेनं एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आखला आहे.

यात नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तज्ञ उत्तर देतील. खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, जीव शास्त्रज्ञ डॉ. संजीव गलांडे, कृषीतज्ज्ञ डॉ. आनंद कर्वे संबंधित विषयांवर मार्गदर्शन करतील. आपले प्रश्न  अ .पां. देशपांडे यांना  apd1942@gmail.com या इ-मेलवर पाठवावेत. ते प्रश्न संबंधित विषयाच्या तज्ञाला  पाठवले जातील. ते या प्रश्नांची उत्तरं  देतील.

प्रश्नकर्त्याला ती उत्तरं  कुठे ऐकता येतील त्याची लिंक कळवली जाईल. ही योजना येत्या  १४ एप्रिल पर्यंत सुरु  राहील, अशी माहिती  मराठी विज्ञान परिषदेनं दिली आहे.