नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात पर्यटक व्हिसावर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 960 परदेशी नागरीकांना केंद्रीय गृह मंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे

नियमभंग करणाऱ्या या सर्व व्यक्तींविरोधात, कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधल्या संबंधित कलमाअंतर्गत, संबंधित राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महासंचालकांनी आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी प्राधान्यानं आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही गृह मंत्रालयानं दिले आहेत.