नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या पार्श्व भुमीवर देशभरात असलेल्या टाळेबंदिच्या काळात भारतीय अन्न प्राधिकरणाद्वारे अन्नधान्याचा निरंतर पुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ५ किलो अन्नधान्य दिलं जातं. याबरोबरंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी ८१ कोटी ३५ लाख लाभार्थींना  आणखी ५ किलो अन्नधान्य देण्यासाठी प्रधिकरणानं कंबर कसली आहे.

काल रेल्वेच्या ६९ वाघिणींमधून १ लाख ९३ हजार मेट्रीक टन एवढा अन्नधान्याचा साठा देशातल्या विविध भागात पाठवला गेला. आतापर्यंत ४७७ रेल्वेच्या वाघिणीं मधून १३ लाख ३६ हजार मेट्रीक टन एवढा अन्नसाठा देशाच्या विवध भागात पाठवला गेला आहे.