नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळे बंदीच्या काळात पश्चिम रेल्वेतर्फे जीवनावश्यक वस्तूंसाठी चार विशेष पार्सल रेल्वे सेवा सुरू आहेत. देशातल्या विविध विभागात दूध, फळं, भाज्या, बिस्किटं, तसंच जनावरांसाठी सुका चारा आदी पदार्थांची ने-आण सुरूच आहे.

लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये याकरिता अहोरात्र ही सेवा सुरू आहे, आणि १४ एप्रिल पर्यंत ही सेवा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे, असं पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

एकूण १८ मालगाड्या देशाच्या विविध भागात ही सेवा देत असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.