नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ या भयंकर साथीविरुद्धच्या लढ्यात कुणीही एकटं नाही, आपण सर्व एकजूट आहोत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आपली एकजूट दाखवण्यासाठी सर्व देशवासियांनी येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले सर्व विजेचे दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे लावावेत, किंवा मोबाईल फोनचे फ्लॅशलाईट उजळावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.