नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्याबाबत महत्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला.

आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा, शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने ५ रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.