पिंपरी : दिनांक ११ मार्च ते ९ एप्रील 2020 रोजी पर्यंत “अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवडच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत चोवीस तास हेल्पलाईनव्दारे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येऊन कंटोल रूममार्फत प्राप्त तक्रारीवरुन एकुन ३३९५ लाभार्थींना जिवनावश्यक वस्तू व फुड पॅकेटचे (तांदूळ १० किलो, आटा १०किलो, मुगडाळ व तुरडाळ ५ किलो, साखर २ किलो, तेल १ लिटर, मीठ १ किलो, कांदा मसाले, इत्यादी) वाटप करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवडमधील एकून ३० गावांमध्ये बेघर पर-राज्यातील विस्थापित मजूर व गोरगरीब कुंटुबांना तापुरता निवारा क्रेंद्र, अन्नछत्र व अकरा क्षेञीय कार्यालयमार्फत नाश्ता, जेवण, निवारा व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे .
तहसिल कार्यालयमधील तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी तलाठी व मंडल अधिकारी यांनी एकदिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी तसेच एकच दिवसाचा पगारातून अन्नधान्य व फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. अप्पर तहसिल कार्यालयाला शहरातून पंधरा सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळाले.
गिता गायकवाड (तहसिदार) यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अंकुश आटोळे, भावना पवार, भीमाशंकर बनसोडे, अनिल घोडके, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, जयश्री कवडे व तलाठी आतुल गिते, शांता बाणखेले, मारुती पवार, अर्चना रोकडे, रश्मी गालपिल्ले,अजय चडचणकर,रुपाली परिहार, स्वप्नील पटांगे, संदीप शिंदे यांनी परिश्रम केले, अशी माहिती मंडल अधिकारी चिंचवड गणेश सोमवंशी यांनी दिली.
अप्पर तहसील कार्यालय यांच्या कामाचा आढावा पुढिलप्रमाणे
दिनांक 11/3/2020 रोजी, बुधवारी
अप्पर तहसील कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे करोना संसर्ग आजारबाबतीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सन 2020 स्थापन करण्यात येऊन, या ठिकाणी 24 तास हेल्पलाईन कक्षामध्ये सकाळी सात वाजता ते सायंकाळी सात वाजेपर्यंत व सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत कार्यालयीन कर्मचारी व तलाठी कोतवाल यांची नेमणूक करण्यात आली.
दिनांक 28/3/2020 रोजी, शनिवारी
सकाळी दहा वाजता अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचारी व कोतवाल यांनी स्पाईन रोड चिखली येथील भीमशक्ती झोपडपट्टीतील नऊ लोकांना दहा किलो तांदूळ, पाच किलो बटाटे, एक किलो तेल पाकिट, कांदा लसूण मसाला पाकिट वाटप करण्यात आले आहे.
मा. अप्पर तहसील साहेब पिंपरी-चिंचवड व तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी व मंडल अधिकारी यांचेकडून फूड पॅकेट बनवण्यासाठी रक्कम रुपये 50.000/- आर्थिक मदत करण्यात आली. सकाळी 11 वाजता ते दुपारी 1.30 वाजता नेहरूनगर येथील अजमेरा समोरील मोकळ्या जागेतील झोपडपट्ट्या, असे लहान-मोठे एकूण 67 गरजू व्यक्तींना मा.अप्पर तहसिलदार साहेब, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या हस्ते फूड पाकिटाचे वाटप करण्यात आले आहे.
भोसरी हद्तीदील नाशिक फाटा येथील पोलिसलाईन समोरिल झोपड्यातील 20 लोकांना मा. अप्पर तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी यांनी दुपारी 2.30 वाजता फुड पॅकेट यांचे वाटप करण्यात आले.
दिनांक 29/3/2020 रोजी, रविवारी
पिंपरी जुनी भाजी मंडई येथील पिंपरी कॅम्पमधील 19 लोकांना मंडल अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत चहा, बिस्कीट, पाणी, वाटप करण्यात आले. दापोडी हुतात्मा भगतसिंग माध्यमिक विद्यालय मुला-मुलींची शाळा दापोडी येथे राहण्याची व जेवण्याची सोय मंडलाधिकारी यांच्यामार्फत चहा, बिस्कीट वाटप करण्यात आली.
दिनांक 30/3/2020 रोजी, सोमवार
भोसरीतील श्री. हिराणम लांडगे चाळ येथील सुमारे 60 लोकांना, जय महाराष्ट्र चौक येथील झोपडपट्टीतील 16 कुटुंबांना व शास्त्री चौकातील लोकांना 25 किलो तूरडाळ व 50 किलो तांदूळ, तहसील कार्यालयामार्फत मंडल अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत वाटप करण्यात आलेले आहे.
दिनांक 31/3/2020 रोजी, मंगळवार
आय.आर.एस.असोसिएशन पुणे यांच्यामार्फत 500 किलो तांदूळ, 500 किलो आटा, 210 किलो तूरडाळ, 210 किलो मुगडाळ, 200 साखर किलो, 250 लीटर तेल, 400 मीठ किलो, असे एकूण 2270 क्विंटल गुलटेकडी मार्केटयार्ड ते आकुर्डी, अप्पर तहसिल, पिंपरी चिंचवड येथील स्टोर रुममध्ये उतरुन घेण्यात आले आहे.
दिनांक 1/4/2020 रोजी, बुधवार
पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूरडाळ, दोन किलो मुगडाळ, एक किलो साखर, एक पॅकेट तेल व एक किलो मीठ इत्यादी त्यांचे पॅकिंग तयार केले आहे.
मौजे देहू तालुका हवेली येथील वैकुंठगमन मंदिर येथील भक्तनिवासा मध्ये शंभर लोकांची मा. अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड साहेब, कामगार तलाठी देहू व ग्राम विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत निवाऱ्याची सोय करण्यात येऊन संबंधित लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिनांक 2/4/2020 रोजी, गुरुवार
मौजे किवळे (आदर्शनगर) येथील परराज्यातील मजुरांना व देहू येथील गथसमेने वृद्धाश्रम या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे (पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, दोन किलो तूरडाळ, एक किलो मीठ व एक लिटर खाद्यतेल) वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दिनांक 3/4/2020 रोजी, गुरुवार
मंडलाधिकारी भोसरी/चिंचवड व तलाठी भोसरी यांनी शास्त्री चौक व पीएमटी चौकातील एकूण 39 कुटुंबातील 120 लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची (पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, दोन किलो तुरडाळ, एक किलो मीठ व एक लिटर खाद्यतेल) वस्तूंचे वाटप करण्यात आले.
दिनांक 4/4/2020 रोजी, शनिवार
मौजे चिंचवड येथील कंट्रोल रूममधून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकूण अकरा कुटुंबांना 8 किलो तूरडाळ, 20 किलो आटा, 20 किलो तांदूळ, मीठ 4 किलो, खाद्यतेल 3 लिटर या जीवनावश्यक वस्तूंचे तलाठी श्रीमती अर्चना रोकडे यांनी वाटप केले.
मौजे चिखली येथील कंट्रोल रूममधून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून एकूण 32 कुटुंबांना 50 किलो गहू, 20 किलो मुगडाळ, आटा 80 किलो, तांदूळ 70 किलो, मीठ 10 किलो, 20 लीटर खाद्यतेल या जीवनावश्यक वस्तूचे तलाठी श्री अजय चडचणकर यांनी वाटप केले.
दिनांक 5/4/2020 रोजी, रविवार
मौजे आकुर्डी हवेली (अजंठानगर) येथील एकूण 40 गरजूंना फूड पॅकेटचे वाटप तलाठी श्रीमती शांता बाणखेले यांच्या हास्ते करण्यात आले.
मौजे निगडी तालुका हवेली दत्तनगर सिद्धिविनायक नगरी येथे 50 व्यक्तीना शिव भोजन पाणीवाटप तलाठी श्रीमती शांता बाणखेले यांच्या हास्ते करण्यात आले.
माननीय प्रधानमंत्री महोदय भारत सरकार यांच्या आवाहनानुसार, मौजे देहू, तालुका हवेली येथील निवारा केंद्रांमध्ये सायंकाळी नऊ वाजता कँडल लावून एकात्मकतेचे दर्शन घडविण्यात आले. तसेच सोशल डिस्टन्स ठेवून एकत्रित सुमारे 225 लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.