नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला, फळं आणि कांदा-बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कांदा बटाटा बाजार आडत व्यापारी संघानं आज हा निर्णय घेतला. तसं पत्र बाजार समिती सचिवांना देण्यात आलं आहे. सध्या मुंबई आणि परिसराला मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास पुरवठा सुरळीत केला जाईल असं व्यापा-यांनी सांगितलं.

संचारबंदी संपेपर्यंत मुंबईतल्या धारावीत फळे आणि भाजी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. कोणताही विक्रेता किंवा फेरीवाला दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात उद्यापासून दुपारी 2 नंतर किराणा दुकानं, डेअरी, भाजीपाला विक्री बं