नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी आणि मैत्रीचा पुरावा असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे. यामुळे भारतातील ऑक्सिजन क्षमता वाढेल असंही बागची यांनी म्हटलं आहे.