ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे काल तीनजणांचा मृत्यू झाला असून, पाचजण बेपत्ता झाले आहेत. या आगीत किमान दोन शाळा आणि सुमारे एक डझन घरं भस्मसात झाल्याचा अंदाज आहे.

ही आग तिथल्या लोकप्रिय पर्यटन स्थळांना आपल्या कवेत घेत अग्नेय भागापर्यंत पोहोचली आहे. समुद्रकिनार्‍यावर अडकून पडलेल्या हजारो लोकांच्या सुटकेसाठी तिथल्या सरकारनं बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु केलं आहे.

हा वणवा गेले कित्येक महिने सुरु असल्यानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं कामही सुरु आहे. या आगीत आतापर्यंत तेराजणांचा मृत्यू झाला आहे, तर एक हजार घरं नामशेष झाली आहेत. लाखो एकर जमीन या वणव्यात होरपळून निघाली आहे.